मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

बारवाई (Barvai) किल्ल्याची ऊंची :  800
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रत्नागिरी ,कोकण
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
चिपळूणच्या जवळ असलेला हा दूर्ग सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळ्या असलेल्या डोंगरावर वसला होता. पेढांबे येथे सापडलेल्या ‘दसपटीचा इतिहास’ या पुस्तकात या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. किल्ल्याचे स्थान व रचना पाहता या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा.
8 Photos available for this fort
Barvai
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्यावर कुठलेही अवशेष शिल्लक नाहीत. किल्ल्याच्या पठारावर देवराइत भैरी देवीची मुर्ती आहे. पठारावर पश्चिमबाजूच्या टेकडीवर एक वीरगळ उघड्यावर जमिनीत पुरलेली आहे. स्थानिक लोक त्याला ‘वेताळ’ म्हणून ओळखतात. त्याच्या थोडे पूढे जावून खाली उतरल्यावर एक छोटी गुहा आहे, पण आता ती बुजलेली आहे.

किल्ल्याच्या उत्तरेकडील टेकडीवर चढल्यावर दगडात कोरलेले खोदलेले ४ फूट X ४ फूटचे तीन चर दिसतात. यांचा पुढील भाग निमुळता होत जाऊन तो कड्याच्या टोकापर्यंत जातो. या चरांचे नक्की प्रयोजन समजत नाही. कदाचित गडवरून टेहळणी/मारा करतांना या चरांचा ऊपयोग आडोसा म्हणून होत असावा. याच टेकडीवर घरांच्या जोत्याचे अवशेष दिसतात गडावर कुठेही पाण्याची सोय नाही.
पोहोचण्याच्या वाटा :
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. खडपोलीतील सुकाइ मंदिरात किंवा उगवतवाडीतील मंदिरात रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
उगवतवाडीहून २ तास.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...