मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort)) किल्ल्याची ऊंची :  2500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : बेळगाव श्रेणी : सोपी
बेळगाव या बाजारपेठच्या शहराचे रक्षण करण्यासाठी बेळगावचा किल्ला हा भूईकोट बाधण्यात आला होता. या किल्ल्याकडे येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बेळगावच्या दक्षिणेस एका सुट्या डोंगरावर राजहंसगड हा किल्ला बांधण्यात आला होता. या किल्ल्याचा मुख्य उद्देश टेहळणीचा असल्याने किल्ला आटोपशीर आहे
16 Photos available for this fort
Rajhansgad (Yellur Fort)
Rajhansgad (Yellur Fort)
Rajhansgad (Yellur Fort)
इतिहास :
रट्ट घराण्याने राजहंसगड बांधला . त्यानंतर आदिलशाहीच्या काळात असाद खान लारी या पर्शियन सरदाराने दगडाने किल्ला बांधला आणि त्याला आजचे स्वरुप दिले. त्यानंतर हा किल्ला विविध राजवटींच्या अधिपत्याखाली होता. या किल्ल्यावर ३ लढाया झाल्या आहेत . पहीली लढाई पेशवे आणि सावनूरचे नवाब यांच्यात झाली . दुसरी लढाई पेशवे आणि टिपू सुलतान यांच्या मध्ये झाली . तिसरी लढाई भिवगड आणि राजहंसगडच्या सैन्यात झाली होती.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याचे प्रवेशव्दार गोमुखी आहे. प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर समोर सिध्देश्वराचे जीर्णोद्धारीत मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे . टाकीच्या आत कमानी आहेत.सध्या लोखंडी जाळी लावून ती टाकी झाकलेली आहे. टाकीच्या बाजूला एका वास्तूचे अवशेष आहेत ते दारु कोठार असावे . त्याच्या पुढे तळघर असलेली एक वास्तू आहे . सध्या केवळ तळघरच शाबूत आहे . या वास्तूपासून पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकावर पोहोचतो. येथून तटबंदीवरुन किल्ल्याची प्रदक्षिणा करायला सुरुवात करावी . दोन बुरुज पार केल्यावर तिसऱ्या बुरुजाच्या बाजूला एक चोरदरवाजा आहे . आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत . चोर दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर तटबंदीत इंग्रजी L आकाराची खोली आहे. सिध्देश्वर मंदिराच्या बाजूला एक विहिर आहे . त्याच्या बाजूला पाणी साठवण्यासाठी दगडी धोणी आहे . फांजीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा घालून आपण पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो. किल्ला पाहाण्यासाठी अर्धा तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
बेळगाव येळ्ळूर अंतर १४ किलोमीटर आहे . येळ्ळूर ते राजहंसगड अंतर ४ किमी आहे . खाजगी वहानाने थेट किल्ल्याच्या दरवाजाजवळ जाता येते .
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...