मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

दांडा किल्ला (Danda Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी
पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांना सुपरिचित आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकापासून ९ कि.मी व केळवे गावातून १ कि.मीवर दांडा खाडी आहे. या खाडीचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी दांडा किल्ल्याची निर्मिती केली होती.
3 Photos available for this fort
Danda Fort
पहाण्याची ठिकाणे :
दांडा किल्ल्याचे फारच थोडे अवशेष उरलेले आहेत. ते अवशेषही गावभर विखुरलेले आहेत. केळवे गावातून दांडाखाडी ओलांडून दांडा गावात शिरल्यावर डाव्या हाताला दांडा किल्ल्याचे काही अवशेष दिसतात. या ठिकाणी वाढलेल्या वडाच्या झाडांनी हे अवशेष धरुन ठेवलेले आहेत. गावकर्‍यांनी या जागी सार्वजनिक संडास बांधला आहे. अवशेषावरुन येथे किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे असे वाटते. प्रवेशद्वाराच्या बाजूच्या देवडी प्रमाणे दिसणारा भाग ओळखता येतो. या ठिकाणी एक चौकोनी विहिर आहे. गडाचे इतर अवशेष गावात विखुरलेले आहेत.

दांडा फुटका बुरुज:- दांडा किल्ल्याच्या संरक्षणासाठी पोर्तुगिजांनी दांडा फुटका बुरुजाची उभारणी केली. सदर फुटका बुरुज दांडा पुलाजवळ उध्वस्त अवस्थेत आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
केळवे रेल्वे स्टेशनवरुन ८ किमीवर केळवे गाव आहे. रिक्षा किंवा बसने येथे पोहचता येते. केळवे गावातील चौकातून डाव्या हाताने जाणार्‍या रस्त्याने कस्टम किल्ला, केळवे पाणकोट, फुटका बुरुज पहात दांडा खाडी ओलांडून १ किमी वरील दांडा गावात पोहोचता येते. किल्ल्याचे अवशेष रस्त्याच्या बाजूस व गावात विखुरलेले आहेत. याच रस्त्याने खटाल गावामार्गे १.५ किमी वरील भवानगडला जाता येते.
सूचना :
१)भवानगड(१.५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१.५किमी), केळवे पाणकोट (१.५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पाहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.

२)भवानगड, केळवे पाणकोट ,केळवे भुईकोट ,माहिमचा किल्ला व शिरगावचा किल्ला या किल्ल्यांची माहीती साईटवर दिलेली आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: D
 दांडा किल्ला (Danda Fort)  दार्‍या घाट (Darya Ghat)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  दातेगड (Dategad)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  धाकोबा (Dhakoba)  धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)
 धारावी किल्ला (Dharavi Fort)  धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोडप (Dhodap)
 धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)
 दुर्ग (Durg)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))