मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : सोपी
सुवर्णगडाच्या संरक्षणासाठी हर्णे गावाच्या समुद्रकिनार्‍यावर गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड हे तीन उपदुर्ग बांधण्यात आले. त्यापैकी गोवा किल्ला व कनकदुर्ग यांचे काही अवशेष आजही शाबूत आहेत. परंतु फत्तेगडाची समुद्राकडील भिंत(तटबंदी) व कनकदुर्ग आणि फत्तेगड यांच्या मधील दगडी पुल सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत.
4 Photos available for this fort
Fattegad
इतिहास :
फत्तेगडाची उभारणी खर्यातखान याने केली व त्याची निर्मिती शिवकालानंतरची असावी असे मानतात. कान्होजी आंग्रे - मानाजी आंग्रे यांनंतर सुवर्णगड ,गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड या किल्ल्यांचा ताबा तुळाजी आंग्रे यांच्याकडे गेला. पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर , पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने तुळाजी आंग्रे यांच्या विरुध्द मोहीम उघडली. त्यावेळी कमांडर जेम्स याने हे किल्ले जिंकून पेशव्यांच्या हवाली केले. इ.स. १८१७ मध्ये इंग्रजांनी हे किल्ले पेशव्यांकडून जिंकून घेतले.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याचे क्षेत्रफळ पाऊण हेक्टर होते. फत्तेगडाची समुद्राकडील भिंत(तटबंदी) व कनकदुर्ग आणि फत्तेगड यांच्या मधील दगडी पुल सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबईहून दापोली मार्गे मुरुड हर्णेला जाता येते. हर्णेच्या समुद्रकिनार्‍यावर उंचवट्यावर कोळी लोकांची वस्ती दिसते, ही वस्ती फत्तेदुर्ग मध्येच वसलेली आहे..
राहाण्याची सोय :
राहण्याची सोय किल्ल्यात नाही, हर्णे गावात आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय किल्ल्यात नाही, हर्णे गावात आहे.
पाण्याची सोय :
पाण्याची सोय किल्ल्यात नाही, हर्णे गावात आहे.
सूचना :
१) मुरुड हर्णेला राहून सूवर्णदुर्ग, गोवा किल्ला, कनकदुर्ग व फत्तेगड एका दिवसात पाहाता येतात.
२) सूवर्णदुर्ग, कनकदुर्ग व गोवा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: F
 फर्दापूर सराई (Fardapur Sarai)  फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)