मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg) किल्ल्याची ऊंची :  200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रत्नागिरी ,कोकण
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
रत्नागिरी शहरापासून अवघ्या २ ते ३ किमी वर असणारा रत्नदुर्ग हा त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. येथून दिसणार्‍या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्‍या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे या आकर्षणात भरच पडली आहे. रत्नदुर्ग रत्नांगिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.

5 Photos available for this fort
Ratnadurg
इतिहास :
रत्नदुर्गाची बांधणी बहामनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडुन जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते, हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग.आज हा भुयारी मार्ग वापरात नाही. पण दिपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना जी तटबंदी लागते त्या तटबंदीवरून या भुयाराचे दुसरे टोक असलेली एक प्रचंड गुहा, खाली समुद्रकिनार्‍यावर स्पष्ट दिसते. या भिंतींनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव "रेडे बुरूज" असून यावर एक स्तंभही उभारलला आहे.
किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून, या दिपगृहावरुन संपूर्ण रत्नांगिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे.
रत्नागिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा सोईची असून रत्नांगिरी शहराचा नजारा दिपगृहावरुन बघण्यासाठी संध्याकाळी ५.०० च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते.
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता असून किल्ल्याच्या पायथ्याशीच शंकराचे श्री भागेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर चित्रे केरलेली असून मंदिराच्या सभोवती नारळी, पोफळी व फुलझाडांनी बहरलेली बाग आहे.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही. रत्नागिरी शहरात राहण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. रत्नागिरी शहरात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
मंदिराजवळ पिण्याचे पाणी मिळू शकते.
सूचना :
१) रत्नागिरी शहरात दोन दिवस मुक्काम करून रत्नदुर्गा बरोबर थिबा पॅलेस, गणपतीपुळे आणि पूर्णगड, जयगड, विजयगड, आंबोळगड हे किल्ले पाहाता येतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: R
 रायगड (Raigad)  रायकोट (Raikot)  रायरेश्वर (Raireshwar)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))
 राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)  राजधेर (Rajdher)  राजगड (Rajgad)  राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))
 राजकोट (Rajkot)  राजमाची (Rajmachi)  रामदरणे (Ramdarne)  रामदुर्ग (Ramdurg)
 रामगड (Ramgad)  रामशेज (Ramshej)  रामटेक (Ramtek)  रांगणा (Rangana)
 रांजणगिरी (Ranjangiri)  रसाळगड (Rasalgad)  रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort))  रतनगड (Ratangad)
 रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))  रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)  रवळ्या (Rawlya)  रेवदंडा (Revdanda)
 रिवा किल्ला (Riwa Fort)  रोहीडा (Rohida)  रोहिलगड (Rohilgad)