मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सुलतान गढी (Sulatan Gadhi) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : अमरावती श्रेणी : सोपी
अचलपूर जवळुन सापन नदी वाहाते. या नदीच्या काठावर अचलपूर पासून ३ किलोमीटरवर नदी काठी असलेल्या टेकडीवर वीटांनी बांधलेला किल्ला आहे . या भुईकोट किल्ल्याला सुलतान गढी या नावाने ओळखतात. या गावात असलेले पुरातन भुलभुलैय्या दत्तमंदीर ही पाहाण्यासारखे आहे.

अचलपूरचा किल्ला, सुलतान गढी, भुलभुलैय्या दत्तमंदीर, राजा मानसिंह समाधी, मंडलेश्वर बारव, आणि हौद कटोरा ही ठिकाण एकमेकांपासून ३ - ३ किलोमीटरवर आहेत.

5 Photos available for this fort
Sulatan Gadhi
इतिहास :
अफगाणिस्तानातून दिल्लीत व्यापारासाठी आलेला पठाण शम्स खान आणि त्याचा मुलगा हमीद खा पन्नी यांनी घोड्याचा व्यापार केला. व्यापाराच्या निमित्ताने मुघलांबरोबर नागपूर येथे येऊन पुढे त्याने बख्त बुलंद राजाकडे राहून घोड्याचा व्यापार करू लागले. व्यापारातून मिळालेल्या पैशाने इसविसन १६९६ मध्ये त्याने अचलपूर जवळ जमीन खरेदी करून गावे वसवलली त्यास सुलतानपुरा आणि सरमस्तपुरा अशी नाव दिली.
सुलतान खानने सुलतानपुरात गढी बांधली. त्याचा मुलगा नाबाब इस्माईल खान याने १७६४ साली अचलपूरचे सुभेदार पद मिळवले. तेथून अचलपूरचे पन्नी घराणे उदयास आले. या गढी तुन कारभार करत नंतरच्या काळात त्याने अचलपूरचा परकोट बांधला आणि तेथून कारभार बघू लागला.
पहाण्याची ठिकाणे :
सुलतानपुर गावातून किल्ल्यात जाण्यासाठी विटांनी बांधलेला चढाचा रस्ता आहे. किल्ल्याचे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार त्यावरील खिळे, कडी अजून शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य बुरुज आहेत. प्रवेशव्दारातून किल्ल्यात शिरल्यावर उजव्या बाजूला असलेल्या बुरुजापासून एक भिंत दरवाजाच्या समोर येते. दरवाजातून आत येणार्‍या मार्गाचे संरक्षण करण्यासाठी ती बांधली असावी. किल्ल्याचा आकार साधारणपणे गोल असून तटबंदीत एकुण सात बुरुज आहेत. किल्ल्याचे तटबंदी आणि बुरुज विटांनी बांधलेले आहेत.

तटबंदीला फ़ांजी असून त्यावर चढून जाण्यासाठी जीने आहेत. फ़ांजीवरुन सापन नदीचे पात्र व परिसर सुंदर दिसतो. किल्ल्यात पाण्याची व्यवस्था आढळली नाही. किल्ल्याच्या केलेल्या नुतनीकरणात किल्ल्यात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त किल्ल्याची निगा न राखल्याने किल्ल्यात रान माजलेले आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
अमरावती - अचलपूर रस्त्यावर , अचलपूरच्या अलिकडे टवलार फ़ाटा आहे. या टवलार रस्त्यावर फ़ाट्यापासून ३ किलोमीटर अंतरावर सुलतानपुर गढी आहे. सापन नदीच्या पात्रावरील पूल ओलांडून गावात जाता येते. तेथून रस्त्याने ५ मिनिटात गढीत जाता येते.
राहाण्याची सोय :
राहाण्याची सोय अचलपूर मध्ये आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय अचलपूर मध्ये आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही
जिल्हा Amravati
 आमनेर (Aamner)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)  अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)
 गाविलगड (Gavilgad)  नरनाळा (Narnala)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)