मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : अमरावती श्रेणी : सोपी
अमरावती जिल्ह्यात एलिचपूर म्हणजेच आजचे अचलपूर हे ऐतिहासिक गाव आहे. या गावातील ऐतिहासिक अवशेष सध्या गावाच्या दाट वस्तीत विखुरलेले आहेत. अचलपूरचा किल्ला, सुलतान गढी, भुलभुलैय्या दत्तमंदीर, राजा मानसिंह समाधी, मंडलेश्वर बारव, आणि हौद कटोरा ही ठिकाण एकमेकांपासून ३ - ३ किलोमीटरवर आहेत.

8 Photos available for this fort
Achalpur Fort
इतिहास :
चालुक्य आणि राष्ट्रकुटांच्या काळात एलिचपूर हे महत्वाचे नगर होते असे या भागात सापडलेल्या ताम्रपटांवरुन लक्षात येते.

इसवीसन २९४ ते १३२० काळात या किल्ला खिलजीच्या ताब्यात होता. मोहम्मद तुघलकाचा पुतण्या सुल्तान इमाद-उल-मुलूक याने १३४७ मध्ये इदगाह उभारली. या इमारतीच्या पायऱ्यांवरून त्यावेळी गाविलगडचा किल्ला दिसत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. पुढे मुघल साम्राज्याचे तुकडे होऊन पाचशाह्यांची स्थापना झाली . त्यातील इमादशाहीची डोंगरावरील राजधानी गाविलगड होती , तर जमिनीवरील राजधानी अचलपूर होती. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील होज कटोरा ही वैशिष्टयपूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली.

इमादशाहीच्या अस्तानंतर अचलपूर निजामशाहीकडे आणि त्यानंतर मुधलांच्या ताब्यात गेले. यासत्ताकाळात खापरी नळ बांधून शहरभर पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बिच्छन नदीवर त्यासाठी एक धरणही बांधण्यात आले होते, असा उल्लेख 'गॅझेटियर'मध्ये आहे.. आता हे नळ बंद असले तरी त्याचे अवशेष आणि जागोजागी टाक्या अजूनही कायम आहेत. त्याला 'सातभुळकी' म्हणतात.


शाहू महाराजांनी परसोजी भोसले अमरावतीकर यांना वऱ्हाड प्रांताची जहागिरी दिली होती . इसवीसन १७४४ ते १७५० पर्यंत हा भाग निजामांच्या ताब्यात गेला पण, नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी त्यांचे पुत्र मुधोजी यांना पाठवले होते. काही काळ एलिचपूर हे मुधोजींच्या ताब्यात होते. बालाजी तसेच, श्रीरामाचे देऊळ, शहा इस्माईलखाँ या फकिराचे थडगे नागपूरचे माधोजी भोसले यांनी बांधले.

नाबाब इस्माईल खान याने १७६४ साली अचलपूरचे सुभेदार पद मिळवले. तेथून अचलपूरचे पन्नी घराणे उदयास आले. या गढी तुन कारभार करत नंतरच्या काळात त्याने अचलपूरचा परकोट बांधला आणि तेथून कारभार बघू लागला. शहराच्या बाहेरील परकोट हा नवाब इस्माईलखान याने बांधला. नबाबाचा महाल आणि देवडी ही बहिलोलखान व सलाबतखान याने बांधली. गुलाम हुसैन खान याने इमामवाडा बांधला. त्याच्याच काळात बेबहा बाग बांधण्यात आली. या ठिकाणी इस्माईल खान याचे थडगे आहे. या परिसरात अनेक छोटी मोठी थडगी आहेत . पन्नी घराण्याची ९० वर्षे या ठिकाणी सत्ता गाजवली.
पहाण्याची ठिकाणे :
अचलपूर गावात असलेल्या दाट लोकवस्तीत त्याचे दरवाजे आहेत. या दरवाजातून सध्या रस्ते काढलेले आहेत. यात तीन दरवाजे पाहाता येतात. हिरापूर दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा, दुल्हा दरवाजा, हे दगडात बांधलेले दरवाजे आणि त्यांच्या बाजूला भव्य बुरुज आहेत. दरवाज्या दोन्ही बाजूला नक्षीकाम असलेल्या सुंदर चौकटी कोरलेल्या आहेत. दरवाजावर ब बुरुजावर वीटांनी बांधलेल्या चर्या आहेत. दरवाजावर फ़ारसी भाषेत शिलालेख कोरलेले आहेत. याशिवाय सोनगाव दरवाजा , खिडकी दरवाजा पाहाता येतो. समस्तीपुरा येथे असलेले नवाबोंका कब्रस्थान हेही ऐतिहासिक स्थळ आहे. त्याला दोन प्रवेशव्दारे आहेत. किल्ल्याची तटबंदी अनेक ठिकाणी शाबूत असून दुल्हा गेटच्या पुढे सलग तटबंदी पाहायला मिळते.
पोहोचण्याच्या वाटा :
अमरावतीहून अचलपूर ४८ किलोमीटर अंतरावर आहे. अचलपूर रस्त्याने विदर्भातल्या मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. अचलपूरला आल्यावर रिक्षाने अथवा चालत सर्व ऐतिहासिक ठिकाणे पाहाता येतात.
राहाण्याची सोय :
राहाण्याची सोय अचलपूर मध्ये आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय अचलपूर मध्ये आहे.
पाण्याची सोय :
पाण्याची सोय अचलपूर मध्ये आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)