मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कमळगड (Kamalgad) किल्ल्याची ऊंची :  4200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णानदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.


Kamalgad
19 Photos available for this fort
Kamalgad
Kamalgad
Kamalgad
पहाण्याची ठिकाणे :
आकोशी गावातून दिड ते पावणे दोन तासाच्या चालीनंतर आपण गडावरील लोखंडी शिडीपाशी पोहोचतो. शिडी चढून गेल्यावर गडमाथ्याच्या सपाटीवरून आजुबाजूचा डोंगरदर्‍यांचा सुंदर मुलूख आपल्या दृष्टीपथात येतो. एरवी आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार त्याबाजूचे बुरूज, तटबंदी असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरा-नवरीचे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायर्‍याही आहेत. हीच ती गेरूची किंवा कावेची विहीर, उंच अशा या ५० ते ५५ पायर्‍या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहोचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते. विहिरीच्या वरच्या बाजूला कातळात कोरलेले टाके आहे.

गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झालेली आहे. तिच्यावर बुरुज आणि तटबंदीचे अवशेष आहेत. दक्षिणेकडे गवतात लपलेले चौथर्‍याचे अवशेष दिसतात. नैऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोयरिक कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. थोर संत कवी वामन पंडित यांचीही जवळच भोमगावाला समाधी आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.

१) आकोशी मार्गे :- वाई ते आकोशी अंतर ३५ किलोमीटर आहे. आकोशी गावाच्या पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला दिसणार्‍या डोंगर रांगेवर चढून जाण्यास पाऊण तास लागतो. या डोंगररांगेवरुन ठळक पायवाटेने पश्चिमेकडे कमळगडाच्या दिशेने चालत गेल्यावर पुन्हा चढ लागतो. तो चढ चढून गेल्यावर धनगर वस्ती लागते. या धनगर वस्तीला एका झर्‍यातून पाईप लाईन मधून पाणी आणलेले आहे. या पाईप लाईनीच्या बरोबर १५ मिनिटे चालल्यावर एक छोटा रॉकपॅच लागतो. तो चढऊन गेल्यावर आपण कमळगडच्या खालील पठारावर पोहोचतो. पुढे वाट जंगलातून धनगराच्या घराजवळ जाते. येथून एक वाट अपाल्याला शिडीपाशी घेऊन जाते. आकोशी गावातून दिड ते पावणे दोन तासाच्या चालीनंतर आपण गडावरील लोखंडी शिडीपाशी पोहोचतो. शिडी चढून गेल्यावर गडमाथ्यावर पोहोचतो. गडावर जाण्याचा मार्ग चुकण्याची शक्यता असल्याने धनगरवाडीतून वाटाड्या घ्यावा.

२) वासोळ्या मार्गे:- उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोर्‍यातील असरे, रानोला, वासोळे या गावात वाईहून एसटीने तासभरात पोहोचता येते. वासोळ्यावरुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. त्यापैकी पहिली वाट सोपी पण थोडी दूरची आहे
अ) वासोळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्या दिशेने चढणीस सुरुवात केली असता, आपण साधारण एक ते दीड तासातच माचीजवळ येतो. वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसर्‍या अंगाला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर "यू टर्न" घेऊन पाऊण तासा नंतर आपण किल्ल्याच्या मुख्य पहाडावर येतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५ ते १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊल वाटेने तसेच वर गेले की १५ ते २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र आपण मोकळ्या मैदानावर येतो. येथे धनगरांची वस्ती आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास ३ ते ३.३० तास लागतात.
आ). वासोळ्यावरुन १५ मिनिटे चालत तुपेवाडीला यावे. येथून शाळेच्या बाजुने पुढे जाणारा रस्ता धरायचा. पुढे ७ ते ८ मिनिटात दगडी बांध डावीकडे ठेवून जंगलात जाणारा रस्ता धरायचा. मधे काही ठिकाणी रस्त्याला फाटे फुटले आहेत. गावातून आलेला मुख्य रस्ता सोडायचा नाही. बांध गेल्यावर ५ ते ७ मिनिटात एका ठिकाणी रस्ता उजवीकडे वळतो आणि किल्ल्याची सोंड सुरु होते. या वाटेने दमछाक करणारा चढ आहे. पण तासाभरात आपण माचीवर पोचतो. येथून हाच रस्ता जंगलाच्या वाटेने थेट धनगर वाडीत घेऊन जातो. हा धनगरांचा नेहमीचा रस्ता आहे. याच पठारावरून आपणास कमळगड पूर्णपणे दृष्टीपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे. शेवटच्या टप्प्यात शिडी बसवली आहे. त्याच्या सहाय्याने गडावर जाता येते. या वाटेने गडावर पोहोचण्यास २ ते २.३० तास लागतात.

३) वाईहून - नांदवणे मार्गे :- वाईहून नांदवणे गावी येण्यास सकाळी ९३० वाजता एसटी बस आहे. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते.

४) महाबळेश्वर - नांदवणे मार्गे :- महाबळेश्वरच्या केट्‌स पॉईंट वरून खाली येणार्‍या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोर्‍यात उतरले की, सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गावी पोहचतो. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते

राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच - सहा जण राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची व्यवस्था आपण स्वत…:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही, गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
आकोशी मार्गे २.३० तास, नांदवणे मार्गे अडीच तास ,वासोळ्या गावातून ३ ते ३.३० तास, तुपेवाडीतून गडावर पो
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: K
 कैलासगड (Kailasgad)  काकती किल्ला (Kakati Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)  कलाडगड (Kaladgad)
 कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad))  काळदुर्ग (Kaldurg)  कळसूबाई (Kalsubai)  कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))
 कमळगड (Kamalgad)  कामणदुर्ग (Kamandurg)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कांचन (Kanchan)
 कंधार (Kandhar)  कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))  कण्हेरगड (Kanhergad(Nashik))  कंक्राळा (Kankrala)
 कर्‍हा (Karha)  करमाळा (Karmala Fort)  कर्नाळा (Karnala)  कात्रा (Katra)
 कावनई (Kavnai)  केळवे किल्ला (Kelve Fort)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  केंजळगड (Kenjalgad)
 खैराई किल्ला (Khairai)  खांदेरी (Khanderi)  खर्डा (Kharda)  खारेपाटण (Kharepatan fort)
 खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोहोजगड (Kohoj)  कोकणदिवा (Kokandiva)  कोळदुर्ग (Koldurg)
 कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  कोंढवी (Kondhavi)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  कोर्लई (Korlai)
 कोटकामते (Kotkamate)  कुलंग (Kulang)  कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)