मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

नस्तनपूरची गढी (Nastanpur) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : नाशिक श्रेणी : सोपी
नाशिक चाळीसगाव रस्त्यावर नस्तनपूर गावात "खोजाचा किल्ला" या नावाने ओळखली जाणारी नस्तनपूरची गढी आहे. नस्तनपूर गाव सध्या शनी मंदिरासाठी प्रसिध्द आहे. या मंदिराजवळ महामर्गाला लागून गढी आहे.
11 Photos available for this fort
Nastanpur
पहाण्याची ठिकाणे :
नाशिक चाळीसगाव रस्त्यावरुन गढीकडे जातांना एका झाडाखाली "रावणानुग्रह" मुर्ती आणि तोफ़गोळे पडलेले आहेत. गढीच्या प्रवेशव्दारावर थेट मारा करता येऊ नये यासाठी त्याच्या समोर भिंत बांधलेली आहे. भिंतीच्या बाजूने पुढे गेल्यावर उत्तराभिमुख प्रवेशव्दारातून आपला गढीत प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य बुरुज आहेत. बुरुज दगडांनी बांधलेले असून वरचा भाग वीटांनी बांधलेला आहे, त्यात जागोजागी जंग्या काढलेल्या आहेत . गढीत पायर्‍या असलेली गोल विहिर आहे , या विहिरीच्या बाजूच्या बुरुजात हवा महाल बांधलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गारवा मिळण्यासाठी अशाप्रकारे पाण्या जवळ खोल्या बांधलेल्या असतात. याशिवाय गढीत चौकोनी विहिर असून त्यालगत हमाम खान्याचे अवशेष आहेत. त्यामागे कमानी असलेली वास्तू आहे . गढीत पाण्याचे तीन हौद पाहायला मिळतात. गढील एकूण ११ बुरुज असून तटबंदी कोसळलेली आहे. गढीत काही वास्तूंचे चौथरेही पाहायला मिळतात. गढीच्या बाहेरच्या बाजूला तटबंदीत गणपती मंदिर आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
नाशिक - चांदवड - नांदगाव मार्गे नस्तनपूरची गढी १२८ किलोमीटरवर आहे. नस्तनपूरची गढी पासून जवळचे रेल्वे स्टेशन नांदगाव १५ किलोमीटर अंतरावर आहे. तर चाळीसगाव २८ किलोमीटर अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
गडावर राहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
जेवणाची सोय नाशिक - चाळिसगाव महामार्गावर आहे.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: N
 नगरचा किल्ला (Nagar Fort)  नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)
 नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))  नाणेघाट (Naneghat)  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (Narayangad)
 नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  नरनाळा (Narnala)  नस्तनपूरची गढी (Nastanpur)  न्हावीगड (Nhavigad)
 निमगिरी (Nimgiri)  निवतीचा किल्ला (Nivati Fort)