मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मांगी - तुंगी (Mangi-Tungi) किल्ल्याची ऊंची :  4000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बागलाण
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
बागलाण सुपीक, सधन आणि संपन्न असा मुलूख आहे. सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगररांगेची सुरुवात होते, ती या बागुलगेड (बागलाण) विभागातूनच होते. येथे असणार्‍या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड आहे. मांगी तुंगी ही जैन लेणी आहेत. परंतू बागलाण मधील किल्ल्यांची भटकंती मांगी तुंगी या सुळक्यांना भेट दिल्या शिवाय पूर्ण होत नाही. मांगीतुंगी ही जैन लोकांची तीर्थक्षेत्रे आहेत.
6 Photos available for this fort
Mangi-Tungi
इतिहास :
बागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली.
पहाण्याची ठिकाणे :
मांगी सुळक्याच्या पोटातील गुहांमधे महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि इतर तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. यातील वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती म्हणजे बलभद्राची मुर्ती. बलभद्र म्हणजे श्रीकृष्णाचा भाऊ बलराम, जैन पुराणात त्याचा बलभद्र म्हणुन उल्लेख येतो. बलभद्राची मुर्ती पाठमोरी कोरलेली आहे. डोंगराकडे तोंड करुन तपाला बसल्यामुळे आपल्याला त्याची केवळ पाठच पाहाता येते. मांगी तुंगी या दरम्यानच्या डोंगर सोंडेवर बलरामाने श्रीकृष्णावर अग्निसंस्कार केले व त्यानंतर त्याने जैन धर्माची दिक्षा घेतली अशी आख्यायिका आहे. श्रीकृष्ण व बलराम यांच्या पादुका या डोंगर सोंडेवर आहेत. तिथेच एक पाण्याच कुंड आहे. त्याला कृष्णकुंड म्हणुन ओळखले जाते. मांगी सुळक्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे. या मार्गावर जागोजागी २४ तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. उन -वारा - पाऊस यामुळे या मुर्ती झिजलेल्या आहेत. गुहा मंदिराच्या बाजूला पाण्याची टाक आहेत. या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही.

मांगी पेक्षा तुंगीवर कमी गुहा कोरलेल्या आहेत. त्यात जैन तिर्थंकरांच्या मुर्ती आहेत. त्यातील एका गुहेला बुध्द गुहा म्हणतात. तुंगी सुळक्यालाही प्रदक्षिणा मार्ग आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
मांगी- तुंगीला जायचे असल्यास जाण्यासाठी नाशिक - सटाणा मार्गे (११३ किमी वरील) ताहाराबाद गाठावे. ताहारबाद - पिंपळनेर रस्त्यावर ताहाराबाद पासून ७ किमीवर डावीकडे जाणारा रस्ता भिलवड मार्गे मांगीतुंगीला जातो.या रस्त्यावर भिलवडच्या पुढे दोन फ़ाटे फ़ुटतात, उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो. गुजरात मधून यायचे झाल्यास नीलमोरा रेल्वेस्थानकावरून अहुआ मार्गे ताहराबाद गाठावे. ताहराबाद वरून भिलवाडी पर्यंत येण्यासाठी एसटी किंवा बससेवा उपलब्ध आहे. भिलवाडी हे मांगीतुंगीच्या पायथ्याचे गाव आहे.

भिलवाडीमध्येच जैनांची आदिनाथ, पाश्वर्नाथ यांची मंदिरे आहेत. याला सुद्धा मांगीतुंगीच म्हणतात. मांगीतुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता आहे. वीस मिनिटे रस्त्यावरून चालत गेल्यावर, या रस्त्यावर दोन फ़ाटे फ़ुटतात, उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो. पुढे पायर्‍या लागतात. सुमारे २००० पायर्‍यांचा चढ चढून गेल्यावर आपण एका कमानीपाशी पोहोचतो. पायथ्यापासून कमानी पर्यंत येण्यास २ तास लागतात. येथे दोन वाटा फ़ुटतात. उजवी कडची वाट तुंगी सुळक्याकडे जाते तर डावी कडची वाट मांगी सुळक्याकडे जाते.
मांगीसाठी :- प्रवेशव्दारातून डावीकडे गेलो की पुन्हा पायर्‍या चढून ३० मिनिटात मांगी सुळक्याच्या खालील जैन लेण्यांकडे जाता येत.
तुंगीसाठी :- प्रवेशव्दारातून उजवीकडे गेलो की आपण मांगी आणि तुंगी मधील डोंगरधारेवर येतो. या धारेवरून १० मिनिटे चालल्यावर आपण तुंगी सुळक्याच्या पायथ्याशी येतो. तेथून पायर्‍या चढून १५ मिनिटात तुंगी सुळक्याच्या खालील जैन लेण्यांकडे जाता येत

ताहाराबादहून मांगीतुंगी पर्यंत जाण्यासाठी पूर्ण रिक्षा भाड्याने घेऊन जावे लागते.
ताहाराबाद ते भिलवड रिक्षा चालू असतात (सिट प्रमाणे पैसे देऊन). भिलवडहून मांगीतुंगी चालत गाठण्यास अर्धा तास लागतो.
राहाण्याची सोय :
गावात धर्मशाळा आहे. येथे १० ते १५जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
भिलवाडी गावात जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
गावातूनच पाणी घेणे आवश्यक आहे, कारण गडावर पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून ३ तास लागतात.
सूचना :
१) मांगीतुंगी सुळक्यांकडे जाण्याच्या वाटेवर झाडे किंवा शेड्स नाहीत. त्यामुळे सकाळी लवकर चढुन गेल्यास उन्हाचा त्रास कमी जाणवतो.
२) मांगीतुंगी सुळक्यांकडे जाण्याच्या वाटेवर आणि सुळक्यांवर पिण्यायोग्य पाणी नाही.
३) मांगीतुंगी सुळक्यां पैकी मांगीच्या खाली १०८ फ़ूट उंच भगवान महावीरांची मुर्ती बनवण्याच काम चालू आहे. तिथे पर्यंत रस्ताही बनविलेला आहे. काही वर्षात भगवान महावीरांच्या मुर्ती पर्यंत गाडीने जाता येईल आणि तिथुन ३० मिनिटात मांगीवर जाता येईल. त्यामुळे या भागात पर्यटकांची रिघ लागेल. या ठिकाणाचा पिकनिक स्पॉट होईल अशी शक्यता आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: M
 मच्छिंद्रगड (Machindragad)  माचणूर (Machnur)  मदनगड (Madangad)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))
 माढा गढी/किल्ला (Madha Fort)  मधुमकरंदगड (Madhu makarandgad)  महादेवगड (Mahadevgad)  माहीमचा किल्ला (Mahim Fort)
 माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  महिमानगड (Mahimangad)  महिमतगड (Mahimatgad)  महिपालगड (Mahipalgad)
 महिपतगड (Mahipatgad)  माहुली (Mahuli)  माहूर (Mahurgad)  मलंगगड (Malanggad)
 मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)  मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)  मंडणगड (Mandangad)  मानगड (Mangad)
 मंगळगड (Mangalgad)  मंगळवेढा (Mangalwedha)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  माणिकदूर्ग (Manikdurg)
 माणिकगड (Manikgad)  मणिकपूंज (Manikpunj)  मांजरसुभा (Manjarsubha Fort)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)
 मार्कंड्या (Markandeya)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))  मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोहनगड (Mohangad)
 मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  मोरागड (Moragad)  मोरधन (Mordhan)  मोरगिरी (Morgiri)
 मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  मृगगड (Mrugagad)  मुडागड (Mudagad)  मुल्हेर (Mulher)