मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

माणिकगड (Manikgad) किल्ल्याची ऊंची :  2500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
मुंबई - पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात. प्रबळगड, ईरशाळ, चंदेरी, माथेरान, कर्नाळा, लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे, त्याचे नावं माणिकगङ. पातळगंगा एम. आय. डी. सी. च्या जवळ असल्याने माणिकगडाच्या पायथ्याच्या वडवली गावापर्यंत जाण्यासाठी वाहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
6 Photos available for this fort
Manikgad
Manikgad
Manikgad
पहाण्याची ठिकाणे :
पायथ्याच्या वडगावातून गावाच्या मागिल डोंगरा आडून डोकावणारा माणिकगडाचा माथा दिसतो. परंतु तेथे पोहोचण्यासाठी आपल्याला द्राविडी प्राणायाम करावा लागतो. प्रथम गावामागचा डोंगर चढुन गेल्यावर आपण ठाकरवाडीत पोहोचतो. ठाकरवाडीतून लांबलचक पठार पार करून आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून आपण किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या वडगावातून दिसणार्‍या बाजूच्या विरुध्द बाजूस येतो येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसायला लागतात. येथे सपाटीवर पाण्याच एक टाक आहे. त्याच्या बाजूने पुढे जाऊन थोडे चढून गेल्यावर पूर्वेकडून तुटलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच चुन्याचा घाण्यासाठी कातळात कोरलेला चर दिसतो. पूर्वी याठिकाणी घाण्याचे दगडी चाक होते. आता ते गडावर दिसत नाही. चुन्याच्या घाण्याजवळच त्याची छोटी प्रतिकृती कोरलेली आहे. चुन्याच्या घाण्याजवळून दोन वाटांनी आपल्याला किल्ला पाहाता येतो. सरळ चालत गेल्यास उत्तराभिमुख प्रवेशव्दारापाशी आपण पोहोचतो. गडाचा दरवाजा, पाहारेकर्‍यांसाठी असणार्‍या देवड्या उध्वस्त झालेल्या आहेत. दरवाजाच्या आतल्या बाजूस घुमटी आहे. त्यात एक शेंदुर फ़ासलेली मुर्ती ठेवलेली आहे.

गडाच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस गडाचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाची चौकट अजून शाबुत आहे. व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. दरवाजा ओलांडुन आत गेल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येतो. येथे उजव्या बाजूस मोठ्या वास्तुचे अवशेष आहेत. त्याच्या पुढे गडावरील सर्वात मोठे टाक आहे. ते पाहून दरी उजवी कडे ठेवत पुढे गेल्यावर खाली उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. त्या उतरून गेल्यावर गडाच्या उत्तर टोकावरील य्ध्वस्त बुरुजावर आपण पोहोचतो. येथुन उजवीकडे वळून (दरी डाव्या बाजूस ठेऊन) चालत गेल्यास प्रथम उध्व्स्त चोर दरवाजा दिसतो. पुढे गेल्यावर उजव्या बाजूस पाण्याची २ बुजलेली टाक आहेत. त्याच्या पुढे खोलगट भागात उघड्यावर शंकराची पिंड आणि नंदी आहे. तेथेच एक शेंदुर फ़ासलेली भग्न मुर्त्ती आहे. त्यापुढे रांगेत चार टाकी आहेत. त्यातील छोट्या टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे. याशिवाय या टाक्यांसमोरच दरीच्या बाजूस एक शेंदुर फ़ासलेला दगड दिसतो तेथे दरीच्या खालच्या अंगाला एक टाक आहे.

टाकी पाहून पुढे गेल्यावर आपण पूर्व टोकावरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाच्या बाजूला असलेल्या तुटक्या तटबंदितूनही आपल्याला गडावर येता येते. परंतू त्यासाठी कातळ टप्पा व घसार्‍याची वाट चढून जाविइ लागते. पावसाळ्यात या मार्गाने येणे टाळावे. बुरुजावरुन तटबंदीच्या बाजूने चालत जातांना ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली दिसते. पुढे गडाच्या सर्वोच्च माथ्यावरच्या बुरुजापाशी आपण पोहोचतो. गडावरील सुस्थितीत असलेल्या या बुरुजाला चर्याही आहेत. या बुरुजाच्या पुढे पायर्‍या आहेत. याठिकाणी उध्वस्त दरवाजाचे अवशेष आहेत. गडाच्या आतील भागात असलेल्या या दोन दरवाजे पाहून असे अनुमान काढता येते की गडाच्या सर्वोच्च माथ्याला तटबंदी होती. या दरवाजातून खाली उतरल्यावर पुन्हा गड जिथून पाहायाला सुरवात केली त्या जागेपाशी आपण येऊन पोहचतो. किल्ल्यावरून उत्तरेला प्रबळगड, इरशाळगड, माथेरान , वायव्येला (North West) कर्नाळा आणि इषान्येला (North East) सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो. संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो.
पोहोचण्याच्या वाटा :
पनवेल किंवा खोपोली मार्गे माणिकगडाच्या पायथ्याच्या वडवली गावात जाता येते. वडवली पातळगंगा एम. आय. डी. सी. च्या जवळ असल्याने वाहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
पनवेल मार्गे :- पनवेलहुन दोन मार्गांनी माणिकगडच्या पायथ्याच्या वडवली गावापर्यंत जाता येत.
१) पनवेल - जुना मुंबई पुणे महामार्ग - दांड फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २५ किमी.आहे.
२) पनवेल - जुना मुंबई पुणे महामार्ग - सावळा फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २० किमी. आहे.
पनवेल - वाशिवली बस दर अर्ध्या तासाने आहेत. तसेच दांड फ़ाटा व सावळा फ़ाट्या वरुन ६ आसनी रिक्षाने थेट वडवली पर्यंत जाता येते.

खोपोली मार्गे :- खोपोलीहून - चौक - दांड फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २५ किमी.आहे.

वडगाव किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पायथ्याच्या वडगावातून गावाच्या मागिल डोंगरा आडून डोकावणारा माणिकगडाचा माथा दिसतो. परंतु तेथे पोहोचण्यासाठी आपल्याला द्राविडी प्राणायाम करावा लागतो. प्रथम गावामागचा डोंगर चढुन पाऊण तासात आपण ठाकरवाडीत पोहोचतो. ठाकरवाडीतून लांबलचक पठार पार करून १ तासाने आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून आपण किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या वडगावातून दिसणार्‍या बाजूच्या विरुध्द बाजूस पोहोचण्यास साधरणपणे पाऊण तास लागेतो. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसायला लागतात. येथे सपाटीवर पाण्याच एक टाक आहे. त्याच्या बाजूने पुढे जाऊन थोडे चढून गेल्यावर पूर्वेकडून तुटलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. पायथ्याच्या वडगावातून किल्ल्यावर जाण्यास अडीज ते ३ तास लागतात.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वडगावमार्गे ३ तास लागतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: M
 मच्छिंद्रगड (Machindragad)  माचणूर (Machnur)  मदनगड (Madangad)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))
 माढा गढी/किल्ला (Madha Fort)  मधुमकरंदगड (Madhu makarandgad)  महादेवगड (Mahadevgad)  माहीमचा किल्ला (Mahim Fort)
 माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  महिमानगड (Mahimangad)  महिमतगड (Mahimatgad)  महिपालगड (Mahipalgad)
 महिपतगड (Mahipatgad)  माहुली (Mahuli)  माहूर (Mahurgad)  मलंगगड (Malanggad)
 मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)  मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)  मंडणगड (Mandangad)  मानगड (Mangad)
 मंगळगड (Mangalgad)  मंगळवेढा (Mangalwedha)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  माणिकदूर्ग (Manikdurg)
 माणिकगड (Manikgad)  मणिकपूंज (Manikpunj)  मांजरसुभा (Manjarsubha Fort)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)
 मार्कंड्या (Markandeya)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))  मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोहनगड (Mohangad)
 मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  मोरागड (Moragad)  मोरधन (Mordhan)  मोरगिरी (Morgiri)
 मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  मृगगड (Mrugagad)  मुडागड (Mudagad)  मुल्हेर (Mulher)